ताज्या बातम्यामनोरंजन

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात उतरणार रिंकू राजगुरू आणि ललित प्रभाकर!

मुंबई | महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वातावरणात बैलगाडा शर्यतींचे महत्त्व मोठे आहे. बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जल्लोष पाहायला मिळत आहे. शक्य त्या सगळ्याप्रकारची सुरक्षितता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यती आयोजित होताना दिसत आहेत. याच धर्तीवर आता एक चित्रपट बनणार असून, या चित्रपटात मनोरंजन विश्वातील दोन मोठे चर्चित चेहरे झळकणार आहेत. ‘सैराट’ फेम आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता ललित प्रभाकर ही जोडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक मकरंद माने यांचा खिल्लार हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. न्युक्लिअर अॅरो पिक्चर्स या निर्मिती संस्थेतर्फे ‘खिल्लार’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव मावळ इथं झालेल्या पुणे जिल्हा केसरी भव्य २०-२० बैलगाडा शर्यतीवेळी ‘खिल्लार’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसंच चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं. येत्या काही दिवसांत चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होणार आहे. चित्रपटाची कथा, कलाकार आदी तपशील टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येईल. या चित्रपटाच्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. तर मकरंद आणि रिंकू यांच्याबरोबर ललित प्रभाकर पहिल्यांदाच काम करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये