![स्पेस तंत्रज्ञानात आपण महासत्ता बनणार mit](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/mit-780x470.jpg)
पुणे : भारत हा जगातील सर्वांत मोठी युवाशक्ती असलेला देश आहे. जो विकासाला वेगाने पुढे नेण्यास सक्षम आहे. अचूक आणि प्रभावी मुत्सद्देगिरीचा परिणाम म्हणून जागतिक स्तरावर भारताचे स्थान सातत्याने मजबूत होत असल्याचे मत शास्त्रज्ञ आणि इस्रोचे माजी वैज्ञानिक सचिव डॉ. पी. जी. दिवाकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या सातव्या तुकडीच्या स्वागत कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी अटल इनोव्हेशन मिशनचे माजी अध्यक्ष डॉ. रमान्न रामनाथन, डॉ. उज्ज्वल पाटणी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. संजय उपाध्ये, डॉ. सुनीता मंगेश कराड, डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. महेश चोपडे, डॉ. किशोर रवांदे. डॉ. रजनीश कौर, सचदेव बेदी, रामचंद्र पुजेरी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
रामनाथन म्हणाले, ‘‘जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून शिक्षण घेणे हे सर्व विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. एमआयटीएडीटी विद्यापीठात जागतिक दर्जाच्या शिक्षणासह सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातात.’’ प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह देशसेवेसाठी नेतृत्व करणारे व्यक्तिमत्त्व निर्माण केले जातील. उद्योजक घडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
डॉ. उपाध्ये म्हणाले, की एमआयटी एडीटी विद्यापीठ हा शिक्षणाचा स्वर्ग आहे. बदल्यात युगात करिअर घडविण्यासाठी कान उघडे ठेवा. भारतीय संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन या कॅम्पसमध्ये घडते. प्रा. स्नेहा वाघटकर,डॉ. अशोक घुगे यांनी सूत्रसंचालन केले.