“इगो बाजूला ठेऊन राज ठाकरेंना विचारलं असतं तर…”; मनसेचा भाजपला पाठिंबा?

दिवा – Raju Patil on Rajya Sabha elections | राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने आमदारांना बोलावून घेतलं आहे. अशातच मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी मनसेच्या भूमिकेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे आमदार आणि नेते आशिष शेलार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मित्र आहेत. त्यांनी विनंती केली की तुमचा पाठिंबा तुम्ही भाजपाला देणार का?, राज ठाकरेंनी देखील त्यांना सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी विनंती केली त्यांना मान दिल्याचं राजू पाटील म्हणाले.
दरम्यान, इगो बाजूला ठेऊन राज साहेबांना विचारलं असतं, तर साहेबांनी तो ही विचार केला असता. परंतु काही लोक एमआयएम आणि अबू आझमी यांच्या मागे बिझी असल्यामुळे त्यांनी कदाचित विचार केला नसेल, असा सणसणीत टोलाही पाटील यांनी लगावला आहे.