अक्षय तृतीयेऐवजी ४ मे रोजी होणार मनसेची महाआरती

मुंबई : उद्या (मंगळवार) मनसेनं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचं आयोजन केलं होतं. यासंदर्भातील आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र उद्या रमजान ईद असल्यामुळे मनसेकडून हा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. मात्र रविवारी राज ठाकरेंची सभा झाल्यावर चर्चा करुन, ३ तारखेला घेण्यात आलेली महाआरती स्थगित करुन ४ मे रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.
दरम्यान, राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आले असातना, कुमठेकर रोडवरील हनुमान मंदिरात महाआरती करत हनुमान चालीसाचे पठण देखील केले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेण्यात येणार आणि अयोध्येत प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेण्यास जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच काल औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा पार पडली. यानंतर आता अक्षय तृतीय निमित्ताने मनसेकडून राज्यभरात घेण्यात येणारी महाआरतीला स्थगिती देऊन ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे.