मोदींनी देशाचा नाश कसा करायचा याची एक ‘केस स्टडी’ केली -राहुल गांधी

नवी दिल्ली : काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर ट्विटच्या माध्यमातुन हल्ला चढवला आहे. ट्विटमध्ये त्यांनी त्यांनी म्हटले आहे की, देशात अनेक समस्या उद्भवल्या आहेत. वीज निर्मीतीस अपुरा पडणार कोळसा, नोकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकरी संकटात आहेत, महागाई गगनाला भिडली आहे, उद्योग क्षेत्र अडचणीत आहे. एकाळ वेळी अनेक समस्यांनी देशाला घेरले आहे. मागिल आठ वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधानांच्या चुकीच्या निर्णयामुळे एकेकाळी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या देशाचा नाश कसा करायचा याची एक केस स्टडी असल्याची खोचक टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, हेट इन इंडिया आणि मेक इन इंडिया एकत्र राहू शकत गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक भागात कोळशाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणच्या नागरिकांना लोड शेडिंगसारख्या समस्येला सामोरे जावं लागतं आहे. दिवसेंदिवस हे संकट अधिक गडद होत असून, याचा फटका अनेक उद्योगांनादेखील बसत आहे. तर दुसरीकडे देशात महागाईने देखील जागतिक उच्चांक गाठला आहे. व्यावसायातील गॅस सिलेंडरची किंमत २,३५५ रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. याशिवाय फळे आणि भाज्यांचे भावही वाढले आहेत. महागाई ही आवाक्याच्या बाहेर गेली आहे.