सर्वसामान्यांना दिलासा! मोदी सरकारनं केली मोठी घोषणा, ‘या’ योजनेचा लाभ वाढवला वर्षभरासाठी

नवी दिल्ली | LPG Subsidy Ujjwala Yojana – मोदी सरकारनं (Modi Government) सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलेंडर सबसिडीबाबत (LPG Subsidy) मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं आता एलपीजी गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत केंद्र सरकारनं प्रति एलपीजी सिलिंडर 200 रूपये सबसिडी वर्षभरासाठी वाढवली आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहेत.
केंद्र सरकारनं उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं, उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारनं प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी वर्षभरासाठी वाढवली आहे. सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. हा निर्णय शुक्रवारी (24 मार्च) संध्याकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
पुढे मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवीन अधिसूचनेनुसार सांगितलं की, उज्ज्वला योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना प्रति वर्ष 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. या योजनेमध्ये वर्षभरात 12 सिलिंडर देण्यात येतात. केंद्र सरकारकडून उज्जला योजनेअंतर्गत प्रत्येक सिलिंडरवर 200 रुपयांचे अनुदान मिळते म्हणजेच एका वर्षात सरकारकडून सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना 2400 रुपयांपर्यंत अनुदान मिळते.