बार कौन्सिलतर्फे गिरिप्रेमींचा सत्कार

पुणे : पुण्यातील नामवंत गिरिप्रेमी संस्था यांच्या वतीने अॅडव्होकेट विक्रम दौंडकर यांनी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प चढाईची मोहीम यशस्वीरीत्या पार केल्याबद्दल पुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे वकील संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. राजेंद्र उमाप यांनी चंदननगर येथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंदननगर, वाघोली, हडपसर या पूर्व विभागातील वकील बंधूंनी हजेरी लावली होती.
अध्यक्ष अॅड. उमाप म्हणाले, ‘पर्यटनाची आवड असणारे व निसर्गावर प्रेम करणारे विक्रम दौंडकर हे एक आगळेवेगळे वकील आहेत. त्यांना निसर्गावर अभ्यास करणे व पर्यटनाचा आनंद घेणे भारताच्या कानाकोपर्यात जाऊन दौंडकर यांनी पर्यटनाचा आनंद घेतला आहे व अभ्यासिकेला आहे. त्याचप्रमाणे वकील संघटनेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही दौंडकर करीत असतात, म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळी गणेश अशोक पलांड, शिवाजीराव वाळके, दत्तात्रय काळे, दिलीप जेधे, कांताराम नप्ते, सतीश चापा कानडे, नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांनी आभार मानले.