मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मुंबई इंडियन्सकडून भन्नाट पोस्ट; पाहा पोस्ट

मुंबई | आज कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यात येतो. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा यथावकाश मिळेलही; पण ती वास्तवामध्ये टिकविण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील, हे सत्य आहे. 27 फेब्रवारी हा दिवस राज्यात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्य सरकार, विविध संस्था तसेच राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक जण आज आपल्या व्हाट्सअप स्टेटस, तसेच सोशल मीडियावरून एकमेकांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स फ्रेंचाइज देखील मराठी भाषा दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करीत आहे.
मराठी भाषा दिनानिमित्त मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाउंटवर सोमवारी सकाळ पासूनच मराठी भाषेत ट्विट केले जात आहेत. आतापर्यंत त्यांनी मराठी भाषेत 5 ट्विट केले आहेत. हे पाहून मुंबई इंडिअन्सचे फॅन्स खूपच खुश झाले असून ते या ट्विटवर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.