मुंबईकरांनो सावधान! ‘या’ दिवशी होणार मुसळधार पाऊस!
![मुंबईकरांनो सावधान! 'या' दिवशी होणार मुसळधार पाऊस! monsoon](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/monsoon-780x470.jpg)
मुंबई | Monsoon Updates 2022 – मुंबईकरांसाठी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाडातील बहुतांश भागात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे कमी दाबाच्या क्षेत्रात वेगाने येत आहे. त्यामुळे कोकणात आणि घाट भागात पावसाचा जोर आधिक राहील. राज्यभरात १८ जूनपासून मोसमी पाऊस सक्रिय होणार असून मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे . तर मुंबईत १९ जूनपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी ६० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दक्षिण किनारपट्टीवरही अशीच स्थिती असेल. उंच लाटा आणि खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत कुलाबा येथे ९.४ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ३.८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. १ ते १७ जून या काळात कुलाबा येथे १२९.७ मि. मी., तर सांताक्रूझ येथे ९८.१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.