काय सांगताय! शाहरुख खानच्या ‘मन्नत’ वरील २५ लाख किमतीची नेमप्लेट गायब!
मुंबई : (Shahrukh Khan ‘Mannat’ Bungalows Nameplate worth Rs 25 lakh missing) बाॅलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shahrukh Khan) राहता आलिशान ‘मन्नत’ (Mannat) बंगला नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. तो आहे ही, तेवढाच अप्रतिम त्यामुळं मन्नत पाहण्यासाठी देशभरातून चाहते येत असतात. आपला लाडका कलाकार दिसला नाही तरी, मन्नत बाहेर सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी प्रचंड असते. यावेळी मात्र, चाहत्यांची गर्दी वेगळ्याच कारणासाठी झाली आहे. मन्नत चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, मन्नत बाहेर लावण्यात आलेली तब्बल २५ लाख रुपये किमतीची नेमप्लेट अचानक गायब झाली आहे.
दरम्यान, चित्रपटसृष्टीचा (Bollywood) बादशाह शाहरुख खानचा आलिशान मन्नत बंगला मुंबईतील ब्रॅंड स्टॅंड येथे आहे. बंगल्याबाहेरची मन्नत नावाची घराबाहेरची पाटी गायब झाल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. ही नेमप्लेट गायब असल्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. काही दिवसांपूर्वीच मन्नत वर २५ लाख रुपयांची नविन नेम प्लेट लावण्यात आल्याचा चर्चा रंगली असतानाच आता ती गायब आहे, म्हणून पुन्हा चर्चा झाली आहे.
शाहरुखच्या बंगल्यावर सध्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. त्यामुळे नेमप्लेट काढण्यात आली आहे असं समजलं आहे. त्यात काहींनी तर नेमप्लेट चोरीला गेली असल्याची पोस्ट केल्या आहेत. याबाबतची अधिकृत माहिती समजू शकली नाही. येत्या काही काळात काय ते समोर येईल, साध्य शाहरुख आगामी पठान या चित्रपटासाठी व्यस्त आहे.