ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

चित्ते आणले म्हणून, लम्पी आजार देशात पसरवायला; पटोलेंचा दावा

मुंबई : (Nana Patole On Narendra Modi) देशात लम्पी आजार पसरवण्यासाठी केंद्र सरकारनं मुद्दाम नायजेरियातून चित्ते आणले, त्यामुळे लम्पी आजार देशभर पसरला आहे. याद्वारे मोदींनी जाणूनबुजून शेतकऱ्याचं नुकसान केलं आहे, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधानांनी शेतीचे काळे कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यांशी कधीच बोलले नाहीत. उलट त्यांनी नामिबियातून चित्ते आणून याचा बदला घेत आहेत. चित्त्यांमुळंच लिम्पी व्हायरस भारतात आला” असा गंभीर आरोप पटोले यांनी मोदींवर केला आहे.

लम्पी विषाणूमुळं जनावरांमध्ये त्वचा रोगाची लागण होत असून भारतातील दुग्ध उत्पादनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. हा विषाणू फक्त गायी आणि म्हशींमध्ये आढळून आला आहे. लम्पीची लक्षणे नसलेल्या प्राण्यांचे मांस खाणे किंवा त्यांचे दूध वापरण्यात मानवांना कोणताही धोका नाही. लम्पीपासून प्राणी बरे होऊ शकतात. पण, अशा प्राण्यांच्या दुधावर विषाणूचा परिणाम होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये