ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

भाजप-शिंदे गटाच्या अंतर्गत खदखदीमुळे, शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच अंत होणार?

मुंबई : (Nana patole On Shinde-Fadnavis Government) एकनाथ शिंदेंच्या बंडाळीमुळे राज्याचे नाहक नुकसान झालं आहे. हे सर्वांनाच मान्य करावं लागणार आहे. कारण शिंदे-फडणवीसांच्या केवळ 4 महिन्याच्या कार्यकाळात राज्यातून चार पाच मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. राज्याची गुंतवणूक तर गेलीच शिवाय किमान 3 लाख तरुणांचा रोजगार गेला आहे.

दरम्यान, वेदांता- फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क, मेडिसीन डिव्हाईस पार्क, टाटा एअरबस पाठोपाठ आता विमान तसेच क्षेपणास्त्रांचे इंजिन बनवणारी फ्रेंन्च मल्टिनॅशनल कंपनी सॅफ्रन ग्रुप महाराष्ट्राबाहेर गेली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू झालं आहे. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजप-शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्रात भाजप प्रणित जे ईडी सरकार आलं आहे ते सवैधानिक व्यवस्थेला धरून नाही. अमरावतीतच नाही तर महाराष्ट्रात सर्वत्र खदखद दिसत आहे. महाराष्ट्रात असवैधानिक सरकार आहे. अंतर्गत खदखद सुरू झाल्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारचा लवकरच अंत असल्याचंही नाना पटोले म्हणाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये