ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“ही काही नैसर्गिक आघाडी नाही” नाना पटोलेंचा शिवसेनेला इशारा?

मुंबई : (Nana Patole On Uddhav Thackeray) दि. 20 जुन रोजी एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुरकारले. तेव्हापासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारकार टांगती तलवार होती. त्यानंतर 30 जुन रोजी ‘मविआ’सरकार कोसळलं अन् शिंदेंनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केलं.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून हळुहळु ‘मविआ’मध्ये बिघाडी बघायला मिळत आहे. पहिला मिठाचा खडा पडला तो विधान परिषद विरोधी पक्षनेता निवडीवरून काॅंग्रेस या पदासाठी आग्रही असताना शिवसेनेने आपल्या मित्र पक्षाला विश्वासात न घेत परस्पर शिवसेना नेते अंबादास दानवे यांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

मात्र, यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही नैसर्गिक आघाडी नसल्याचे म्हणत थेट महाविकास आघाडीच्या एकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी तुटण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महाविकास आघाडी कायमस्वरूपी असल्याचा शब्द आम्ही कधी वापरलाच नसल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे एकप्रकारे पटोलेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशाराच दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये