“गद्दारी शिंदे गटाने नाही तर…”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई | Narayan Rane On Uddhav Thackeray – एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना ‘गद्दार’ नावाची पावती दिली आहे. याच संदर्भात आता भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
गद्दारी शिंदे गटाने नाही तर उद्धव ठाकरेंनी केली असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष मोदी एक्सप्रेसची सोय करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी बोलताना राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
“घरात बसून मुख्यमंत्री पद हाताळता येत नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात किमान 10 वर्षे महाराष्ट्र मागे गेला. आमदार आणि पक्षासोबत खरी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. मुख्यमंत्रीपद गद्दारी करून मिळवलं. आमदारांना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. गणरायाच्या कृपेने महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि नवीन सरकार आलं. भारतीय जनता पक्षाची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सर्वांगीन विकास करेल”, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.