ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

G-20 : जो बायडेन यांचे दिल्ली विमानतळावर आगमन, भारताकडून जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल..

नवी दिल्ली : (Narendra Modi On Joe Biden) जी-२० शिखर संमेलनाच्या निमित्ताने जगभरातील नेते भारतात दाखल होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचेही भारतात आगमन झाले आहे. भव्य अशा विमानातून आपले मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत ते दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी भारताकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

जनरल व्ही. के. सिंह हे बायडन यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. अत्याधुनिक अशा कारमधून ते आपल्या हॉटेलकडे रवाना झाले. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आलीये. अमेरिकेन प्रतिनिधींसाठी ५०० खोल्या बूक करण्यात आल्याची माहिती आहे.

जो बायडन पहिल्यांगाच भारतात आले आहेत. बायडन यांच्या येण्याबाबत सांशकता होती. शिवाय त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे बायडन हे भारतात येतील का? याबाबत शंका होती. पण, अखेर त्यांचे भारतात आगमन झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये