नवाब मालिकांच्या कोठडीत 20 मे पर्यंत वाढ
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणात मंत्री नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. तसंच आता नवाब मलिक यांच्या कोठडीत विशेष ईडी न्यायालयाने 20 मे पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार का असा सवाल उपस्थित होत आहे. नवाब मलिक यांच्या कोठडी संदर्भात मुंबईतील विशेष पी. एम. एल. ए. न्यायालयात आज ही सुनावणी झाली आहे. ईडीने मलिकांच्या प्रकरणात 5000 अधिक पाणी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे. त्यामुळे आता त्यांचा 20 मे पर्यंत कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
मंत्री नवाब मलिक यांना यापूर्वी दिलेली त्यांची कोठडी आज संपत असल्यानं त्यांच्या कोठडीत आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टानं त्यांना २२ एप्रिलपर्यंत आणखी चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळू शकलेला नाही. तसंच मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
नवाब मलिक यांनी मागील काही दिवसांपूर्वी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला होता. त्यामुळं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी वाढवून न देता त्यांना फक्त ४ दिवसांची कोठडी वाढवून देण्यात आली होती. त्यामुळं २२ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा आज विशेष ईडी न्यायालयाने सुनावणी केली असून यात त्यांना २० मे पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे