ताज्या बातम्यामनोरंजन

“माझ्यासोबत इंटिमेट सीन करायचाय हे समजताच अभिनेत्री…”, नवाजुद्दीन सिद्दीकीचा खुलासा

मुंबई | Nawazuddin’s Discloure Regarding The Intimate Scene – बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतो. तसंच तो त्याच्या उत्तम अभिनयासाठी देखील ओळखला जातो. नुकताच नवाजुद्दीनचा स्त्रीवेषातील लूक चर्चेत आला आहे. ‘हड्डी’ असं त्याच्या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

तसंच नवाजुद्दीननं काही दिवसांपूर्वीच इंटिमेट सीनबाबत एक खुलासा केला आहे. नवाजुद्दीन ‘रमण राघव’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘कॉमेडी नाईट विथ कपिल’ या कार्यक्रमात गेला होता. कपिलने कार्यक्रमा दरम्यान त्याला काही प्रश्न विचारले, कपिल म्हणाला, ‘कधी बँक लुटणे, खून करणे, शिव्या देणे अशा भूमिका स्वतःहून करतोस की तुला विचारल्या जातात, त्यावर नवाजने उत्तर दिलं की नुकताच एक चित्रपट करत होतो ज्यात मला अभिनेत्रीसोबत इंटिमेट सीन करायचा होता मात्र त्या अभिनेत्रीला जेव्हा हे समजले तेव्हा ती पळून गेली. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला.

पुढे कपिलने विचारले की, ‘एखाद्या निर्मात्याने तुला हवे तितके पैसे दिले आणि हवी ती भूमिका करण्यास सांगितले तर तुला कोणती भूमिका करायला आवडेल’? त्यावर नवाजने उत्तर दिलं होतं की, ‘अर्थात मला रोमँटिक भूमिका करायला आवडेल. हे ऐकल्यानंतर देखील प्रेक्षक पुन्हा एकदा खळखळून हसले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये