डॉक्टर सेलचा समस्यांचा पाढा

पुणे : डॉक्टरांच्या दैनंदिन प्रॅक्टीसमधील अडचणी, नूतन दवाखाना परवाना तसेच परवाना नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात राष्ट्रवादी डॉक्टर सेल, पुण्यातली सर्व डॉक्टर असोसिएशन आणि इतर डॉक्टर सेल यांनी नुकतीच महानगरपालिका मुख्य आयुक्त विक्रम कुमार व पालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांची भेट घेतली.
मनपा आरोग्य प्रमुख डॉ आशिष भारती, साहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ.मनीषा नाईक, डॉ सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली. बैठकीत नवीन हॉस्पिटल परवाना काढणे, हॉस्पिटल परवाना नूतनीकरणात येणाऱ्या अडचणी, बायो मेडिकल वेस्टमधील अडचणी, पासकोचे पेमेंट ऑनलाईन करता येईल, अनेक गावे आता शहरांमध्ये समाविष्ट झाली आहेत त्या संदर्भात हॉस्पिटल रजिस्ट्रेशनमध्ये येणाऱ्या अडचणी, पालिकेमधील रुग्णांसाठीच्या योजनांमधून येणाऱ्या बिलामध्ये विलंब, शहरी गरीब योजना व त्यातील कागदपत्र पूर्ण असतानाही हॉस्पिटला मिळणाऱ्या मोबदल्यातील विलंब, प्रशासकिय यंत्रणेकडुन डाॅक्टरांना होणारा त्रास अशा अनेक विषयांवर चर्चा झाली.