ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिवसेनेनंतर आता शिंदे गटाचा राष्ट्रवादीला जोराचा धक्का!

ठाणे : (NCP Leader Suresh Mhatre join To Shinde Group) एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडून पक्षाविरुद्ध बंड पुकारलं. तेव्हापासून शिंदे गटाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला धक्क्यावर धक्के देत आख्खी शिवसेना खिळखिळी केली आहे. त्यानंतर आता शिंदे गटाने थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच जोराचा धक्का दिला आहे.

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाने राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं आहे. राष्ट्रवादी ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने त्यांच्यावर नव्याने जबाबदारी सोपवली आहे.

सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्यावर शिंदे गटाने भिवंडी लोकसभा मतदारसंघ संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये