क्राईमताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! राष्ट्रवादीचे आमदार सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, १ लाखांच्या खंडणीची मागणी!

पुणे : (NCP MLA Yashwant Mane Sextortion) ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता सायबर चोरट्यांनी थेट आमदार साहेबांनाच जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार यशवंत विठ्ठल माने यांना ब्लॅकमेल करून सायबर चोरट्यांनी त्यांच्याकडून १ लाख रुपयांची मागणी केली. आमदारांनाच जाळ्याच ओढल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी रिजवान अस्लम खान (वय २४ रा. राजस्थान मधील भरतपूर) येथून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आमदार माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरुन माझा नंबर घेऊन, मला संबंधित आरोपी अश्लील संदेश पाठवायचा. तसेच तो मला व्हिडिओ कॉल, फेसबुक-व्हाट्सअॅप वरून सर्वत्र अश्लील मेसेज पाठवून माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने कृत्य करत राहिला, अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रिजवान अस्लम खान असून त्याच्याकडे प्राथमिक तपास केला असता सदर गुन्ह्यात सक्रिय सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून सदर आरोपीकडून एकूण चार मोबाईल, सीम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये स्क्रीन रेकॉर्ड केलेले ९० अश्लील व्हिडिओ आढळून आलेले आहेत. सदर आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी दिलेली असून सदर केसचा तपास पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये