अजित पवार ‘या’ मतदारसंघातून लढणार; प्रफुल पटेल यांनी केली घोषणा

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारसंघ बदलाची चाचपणी करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल यांनी बारामतीमधून अजित पवारांना बारामतीमधून उमेदवारी जाहीर केली आहे. अजित पवार हेच बारामती विधानसभा निवडणूक लढवतील अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी यावेळी केली.
काय म्हणाले प्रफुल पटेल ?
अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने ते स्वत:ची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या नात्याने मी त्यांची उमेदवारी जाहीर करतो, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.
अजित पवार यांनी दिले होते संकेत
सोमवारी रात्री पार पडलेल्या बारामतीमधील व्यापारी मेळाव्यात बोलताना बारामतीतून आपणच उमेदवार असू, असे अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांनी सांगितले. तुमच्या मनातील उमेदवार बारामतीत असेल फक्त घडाळ्याचे चिन्ह दाबा आणि त्याला विधानसभेत पाठवा, असे अजित पवार म्हणाले होते.
लोकसभेला बसला होता फटका
सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजय यांच्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मोठ्या प्रमाणात सुप्रिया सुळेंकडून पराभव पत्करावा लागला होता.