ताज्या बातम्यामनोरंजन

“आयुष्यात कधी आता….”; केतकी चितळे प्रकरणावर प्रविण तरडेंचं वक्तव्य!

पुणे | Pravin Tarade On Ketaki Chitale | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेविरोधात (Actress Ketaki Chitale) पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तसंच सध्या केतकी चितळे न्यायालयीन कोठडीत आहे. यासंदर्भात आता अभिनेते आणि दिग्दर्शक प्रविण तरडे (Actor And Director Pravin Tarade) यांनी भाष्य केलं आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी प्रविण तरडे म्हणाले, “केतकी प्रकरणाबद्दल मला खरच काही माहिती नाही. हे प्रकरण झालं तेव्हा धर्मवीर चित्रपटाचे अंतिम काम सुरू होते. ते झाल्यानंतर प्रमोशनमध्ये वेळ गेला. ते संपल्यानंतर तीन दिवस हंबीराव चित्रपटाचे अंतिम काम सुरू केलं. त्यामुळं काय झालंय हे माहीत नाही. परंतु, कुठल्याच अभिनेत्याने विशिष्ट राजकीय पक्षाची भूमिका घेऊ नये या मताचा मी आहे. मी चित्रपट काढला तर प्रत्येक घटक बघणार आहे. माझ्यावर प्रेम करणार आहे. माझ्या अभिनयामुळं, कामांवर प्रेम केल्यामुळं त्यांचा आयडॉल झालो आहे. त्याचा वापर मी कुठल्या राजकीय पक्षसाठी नाही केला पाहिजे.”

“आपल्यावर प्रेम करणारी माणसे सर्वांची आहेत. त्यामुळं कुठल्याच अभिनेत्याने एक विशिष्ट भूमिका कधीच घेतली नाही पाहिजे. अभिनेता हा सर्वांचा असतो. काही विशिष्ट लोक येत नाहीत त्याचा सिनेमा पाहिला. कलाकृती समाजाची आहे. कलाकार हा समाजाच देणं असू शकतो. समाजाने प्रश्न विचारावेत त्यानं त्याच उत्तर द्यावे या मताचा मी आहे. त्यामुळे प्रवीण तरडे तुम्हाला आयुष्यात कधी कुठल्या राजकीय व्यासपीठावर दिसणार नाही. ज्या दिवशी ते करेल तेव्हा त्याच दिवशी हे क्षेत्र बंद करेल. दोन्ही क्षेत्राचा वापर एकमेकांसाठी नाही करायचा. एक कुठलं तरी पूर्ण वेळ असावं. कलाकार, नट हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आला आहे,” असं देखील प्रवीण तरडे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये