“नवी पिढी उज्ज्वल भविष्याची ताकद” : शरद पवार यांचे प्रतिपादन

बाणेर : आजची नवीन पिढी ही खूप हुशार व स्वयंभू आहे, गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक विद्यार्थी मुले-मुली स्वतःच्या हिमतीने व जिद्दीने शिक्षणात मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करून अनेक विविध क्षेत्रांत आपली उत्कृष्ट कामगिरी करताना आपण सर्वजण पाहात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे आई-वडील दिवस-रात्र मेहनत करून आपल्या मुलांना शिकवतात. आई-वडिलांच्या मेहनतीचे चांगले फळ ही आजची नवीन पिढी देताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे या पिढीमध्ये देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची फार मोठी ताकद आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बाणेर-बालेवाडी, सूस व म्हाळुंगे यांच्या वतीने व बाबुराव चांदे सोशल फाउंडेशन आयोजित म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात शरद पवार बोलत होते. शरद पवार यांनी बाबुराव चांदे यांचे क्रीडा क्षेत्राबरोबरच इतर विविध सामाजिक उपक्रमांबद्दल कौतुक केले.
यावेळी इयत्ता १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या बाणेर-बालेवाडी, सूस व म्हाळुंगे या परिसरातील एकूण ७०० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती मिळते आणि बाणेर-बालवाडी या परिसरातील सर्वात अधिक विद्यार्थी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवितात याचा खरंच मला अभिमान आहे, आजपर्यंत बाणेर-बालेवाडी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत होतो, परंतु आता पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सूस व म्हाळुंगे गावातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा देखील गौरव करताना मला अभिमान वाटत आहे, असे मत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बाबुराव चांदेरे यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी प्रतिभा पवार, विठ्ठलशेठ मणियार, मारुतराव धनकुडे, अंकुश काकडे, मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, सुनील चांदे, अर्जुन शिंदे, जंगल रणव, समीर चांदेरे, अर्जुन ननाव, डॉ. सागर बालवडकर, संजय ताम्हाणे, सुषमा ताम्हाणे, प्राजक्ता ताम्हाणे-दळवी, मनोज बालवडकर, शेखर सायकर, प्रणव कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कळमकर यांवी केले. आभारप्रदर्शन पूनम विशाल विधाते यांनी केले.