सलमान खान धमकी प्रकरणात नवी माहिती आली समोर

मुंबई : ( salman khan threat case ) बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमकीचं पत्र पाठवल्याने एकच खळबळ माजली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या माहितीनुसार, सलमान खानच्या वडिलांना ज्याठिकाणी धमकीचे पत्र मिळालं त्या जागेच्या मागे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित व्यक्ती दिसत आहे. त्याची ओळख अद्याप क्राईम ब्रांचने सांगितलेली नाही. पोलिसांना संशय आहे की, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित त्या लोकांपैकीच एक आहे जो धमकीचे पत्र ठेवण्यासाठी आला होता.
दरम्यान, गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड यानेचं हे धमकीचं पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवलं होतं, अशी माहिती काही दिवसापूर्वी समोर आली होती. आता याप्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकी पत्राची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जलोरामधून आलेले तीन सस्पेक्ट पालघरमध्ये थांबले होते. सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण लॉरेंस बिश्नोईने याआधी सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. लॉरेंसने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेसचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.