ताज्या बातम्यारणधुमाळी

शरद पवारांना भोंदूबाबा म्हणणाऱ्या बावनकुळेंना निलेश लंकेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजप नेत्यांची मानसिकता बिघडली असून…”

मुंबई | Nilesh Lanke On Chandrashekhar Bawankule – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी अडीच वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केला होता, अशी खोचक टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. तसंच बावनकुळेंनी शरद पवारांचा भोंदूबाबा म्हणून उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

“चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांबाबत जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याचा मी निषेध करतो. शरद पवार हे महाराष्ट्राचे भूषण आहेत. ते महाराष्ट्राला लाभलेलं वरदान आहेत. आज राज्यात जो विकास झाला आहे त्यात सिंहाचा वाटा हा शरद पवारांचा आहे. ज्यावेळी महाराष्ट्रावर पूर किंवा भूकंप यासारखी संकटं आली त्यावेळी शरद पवार धावून गेले. महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्याबाबत अशी बेताल वक्तव्य करणं बावनकुळेंना शोभत नाही”, असं निलेश लंके म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “भाजप नेत्यांची मानसिकता बिघडली आहे. त्यातूनच अशी बेताल विधानं केली जात आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी एका मंत्र्यानंही सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आज बावनकुळेंनी शरद पवारांबाबत असं विधान केलं आहे. जेवढं बावनकुळेंचं वय नाही तेवढा शरद पवारांचा राजकीय अनुभव आहे. या लोकांची मानसिकता ढासळली आहे”, असंही लंके यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये