गाईला मिठी मारण्याच्या आदेशातून नागरिकांची अखेर सुटका, सरकारने आदेश मागे घेतला

नवी दिल्ली : (No Cow Hug Day) ‘व्हेलेंटाईन डे’च्या (Valentine Day) दिवशी गाईला मिठी मारून Cow Hug Day साजरा करावा असा आदेश केंद्र सरकारने आज मागे घेतला आहे. गाईला 14 फेब्रुवारी रोजी मिठी मारावी असा आदेश सरकारने काढला होता. त्याला होणारा वाढता विरोध पाहून सरकारकडून आज अखेर चार ओळींचे पत्रक काढत आदेश मागे घेत असल्याची माहिती देण्यात आली. भारतीय पशू कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी रोजी गाईला मिठी मारण्याचा आदेश पशूसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या आदेशानुसार मागे घेण्यात आला.
लोकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. हा निर्णय हास्यास्पद असल्याचे अनेकांनी म्हटले. तर, काहींनी या निर्णयावर तिरकस भाषेत टिप्पणी केली होती. गाईला मिठी मारण्यासाठी 14 फेब्रुवारीच का, इतर दिवस का नाही? असा प्रश्नही सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला होता. या निर्णयानंतर सोशल मीडियावर मीम्सची लाट आली. गाईला मिठी मारल्याने भावनात्मक समृद्धी येईल असा तर्क देण्यात आला होता.
शिवसेनेने देखील शुक्रवारी Cow Hug Day ची थट्टा उडवली होती. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी ‘Holy Cow’ होते. तर, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांतनु सेन यांनी म्हटले की, Cow Hug Day हे लोकांच्या मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. तर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार एलामारम करीम यांनी या दिवसाला हास्यास्पद म्हटले होते. काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी म्हटले की, मी शेतकरी कुटुंबातील आहे. मी फक्त एक दिवस नव्हे तर दररोज माझ्या गाईला मिठी मारते. Cow Hug Day चा आदेश हा बेरोजगारी आणि महागाईसारख्या मुद्यांवरून लोकांचे हटवण्यासाठी काढण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.