ताज्या बातम्यारणधुमाळी

‘दुसऱ्या भोंग्याची गरज नाही…’- बाळा नांदगावकर

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या १ मे रोजी सभा होणार आहे. औरंगाबाद येथील या सभेसाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. ही सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार आहे. मात्र दुसरीकडे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी अद्यापही या सभेला परवानगी दिलेली नाही. तसंच आज बुधवारी (ता.२७) पक्षाचे नेते बाळा नांदगावकर औरंगाबादला आले आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधाल. ते म्हणाले, दुसऱ्या भोंग्याची गरज नाही, जनताच आमचा भोंगा आहे. एकच कॅसेट वाजवून काही उपयोग आहे का ? या शब्दांमध्ये नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, मंगळवारी (ता.२६) पवार यांनी आता यांना भोंगा आठवला असे म्हणत राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावर बाळा नांदगावकर म्हणाले, बाळासाहेब हे बाळासाहेब होते. आमची दिशा, धोरण, नियोजन सर्व राज ठाकरे हेच आहेत. नुसतं हनुमान चालीसा बोलल्याने देशभरात ज्योत प्रज्वलित झाली आहे. तसंच राज ठाकरे यांच्या सभेच्या परवानगीसाठी पोलिस आयुक्तांना भेटणार असल्याचं सांगून नांदगावकर म्हणाले, आम्ही पोलिसांना सहकार्य करणार आहोत. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये