ताज्या बातम्यारणधुमाळी

सदावर्तेंच्या घरी नोटा मोजण्याचं मशीन; सरकारी वकिलांचा दावा

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी न्यायालयात सरकारी वकीलांमार्फत अनेक नवनवे खुलासे होताना बघायला मिळत आहे. अशात एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत जे पैसे सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून घेतले यातून भायखळा आणि परळमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशय पोलिसांनी कोर्टात व्यक्त केला आहे. तसेच सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि  हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये  250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे.

सरकार वकिल प्रदीप घरत म्हणाले, भायखळा आणि परळमध्ये त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे. सोबतच गाडी देखील घेतली आहे. हे सर्व याच पैशातून घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी सदावर्ते यांची पोलिस कोठडी पाहिजे. सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याचे मशीन आणि काही संशयास्पद कागदपत्र आणि वहीसुद्धा मिळाली आहे. सदावर्ते यांनी ॲफिडेव्हिटसाठी फॉर्म बनवला होता. 270 ॲफिटडेव्हिटसाठी आणि 15 रुपये तिकीटासाठी घेतले आहे.  मात्र इतर पैसे लोकांना परत केले नाहीत. हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये पैसे 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख आहे. सोबतच पैसे मोजण्याच्या मशीनमधून 85 लाख रुपये मोजले आहेत.  आलिशान गाडी केरळवरुन खरेदी केली आरटीजीएसनं  23 लाख दिले गेले आहेत.  तसेच या महिन्यात त्यांनी गाडी घेतली.  या काळात त्यांनी प्रॉपर्टी घेतल्या. त्यामुळे हे संशयास्पद आहे. याचा अधिक तपास करायचा आहे. काही  35 पेपर त्यांच्या घरातून जप्त केले आहेत. त्यामुळे आम्हाला पोलिस कोठडी हवी आहे. 


Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये