आता ग्रामपंचायत राबविणार बालस्नेही उपक्रम

पुणे : गावागावांमधील प्रत्येक बालकाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि बालकांना अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने जिल्हा परिषदेच्या वतीने बालस्नेही ग्रामपंचायत हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. बालस्नेही ग्रामपंचायत या उपक्रमांतर्गत पंचायतराज दिनाच्या निमित्ताने घेण्यात येत असलेल्या मुख्य ग्रामसभेत प्रत्येक गावात बालसभा आणि बालपंचायतींचे आयोजन केले जाणार आहे.
या बालसभांसाठी जिल्ह्यातील ११ ते १८ वयोगटातील सर्व बालकांना सामावून घेतले जाणार आहे. गावांना आपापल्या शाश्वत विकासाचे ध्येय येत्या २०३० पर्यंत गाठायचे असेल तर, त्यांनी प्रथम बालकांच्या हक्कांवर काम करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपापली ग्रामपंचायत ही बालस्नेही बनवणे अपेक्षित आहे. यासाठी यंदापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
बालकांनी सभेत मांडलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मुख्य ग्रामसभांमध्ये या समस्या मांडल्या जाणार आहेत. बालमजुरी, बालविवाहाला प्रतिबंध घालणे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्यासाठी असलेल्या सरकारी योजनांची त्यांना माहिती देणे आणि कोरोनामुळे निराधार झालेल्या बालकांच्या विकासासाठी आवश्यक योजनांची अंमलबजावणी करणे आदी विषयांवर या बालसभांमध्ये चर्चा केली जाणार आहे.
या बालसभांसाठी जिल्ह्यातील ११ ते १८ वयोगटातील सर्व बालकांना सामावून घेतले जाणार आहे. गावांना आपापल्या शाश्वत विकासाचे ध्येय येत्या २०३० पर्यंत गाठायचे असेल तर, त्यांनी प्रथम बालकांच्या हक्कांवर काम करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी आपापली ग्रामपंचायत ही बालस्नेही बनवणे अपेक्षित आहे. यासाठी यंदापासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या आहेत योजना… असे आहे नियोजन…
-बालविवाह, बालमजुरी, कोरोनामुळे निर्माण झालेल्या बालकांच्या समस्या व उपाययोजना
-बालकांचे हक्क व त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी
-बालकांसाठीच्या सरकारी योजना
-महिलासभा व ग्रामसभांद्वारे बाल लेखाजोख्यावरील कार्यवाहीबाबतचा ठराव मांडणे
-ग्रामपंचायतीद्वारे गावनिहाय बालविकास कृती आराखडा तयार करणे
-बालविकास कृती आराखड्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे
-सरकारी योजनांच्या लाभासाठी पात्र बालकांची गावनिहाय यादी तयार करणे
-गावांच्या विकासाच्या निर्णय प्रक्रियेत बालकांचा प्रत्यक्ष सहभाग
-बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी गावनिहाय पोषक वातावरणनिर्मिती करणे
-बालहक्कांच्या सुरक्षेसाठीची झेडपीची कार्यपद्धती
-जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालसभा, बालपंचायतींचे आयोजन करणे
-ग्रामपंचायत व बालपंचयातीद्वारे गावांचा नियमित बाललेखाजोखा मांडणे