“ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि शरीर… ” : देवेंद्र फडणवीस
!["ओबीसी भाजपचा डीएनए आहे आणि शरीर... " : देवेंद्र फडणवीस devendra fadanvis 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/04/devendra-fadanvis-2.jpg)
केंद्रात भाजप सरकारला ८ वेर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदेत बोलत आहेत. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. ते म्हणाले कि, “८ वेळा कोर्टाकडून मुदत घेऊनही महाविकास आघाडी सरकारने इम्पेरिकल डेटा गोळा केला नाही. १५ महिने सरकार झोपा काढत होतं म्हणून ते आरक्षण गेलं. मध्य प्रदेश सरकारचाही अहवाल कोर्टाने परत पाठवला होता. मात्र त्या सरकारने मुदत मागितली आणि आठ दिवसांत दुसऱ्यांदा इम्पेरिकल डेटा गोळा केला. आणि तात्काळ सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आरक्षणाला मंजुरी दिली.महाराष्ट्र सरकारला अनेकवेळा मुदत देऊनही त्यांना इइम्पेरिकल डेटा गोळा केला नाही. त्यामुळं ओबीसी आरक्षण गेलं.”
सत्ताधारी पक्षे ओबीसी आरक्षण जाण्याला भाजप सरकार जबाबदार असल्याचं सांगतात असं म्हणत फडणवीस यांनी आम्ही किमान पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण तरी साबूत ठेवलं होत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका देखील ओबीसी आरक्षणावर घेतल्या होत्या. ओबीसी भाजपचा डीएनए आहे तर शरीर समस्त समाज आहे.” असं जाहीरपणे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.