“तिकडून आली मोनिका अन्…”, सुमित पुसावळेनं घेतला बायकोसाठी भन्नाट उखाणा, पाहा व्हिडीओ

मुंबई | Sumeet Pusavale Wedding – कलर्स मराठीवरील ‘बाळू मामाच्या नावानं चांगभलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे (Sumeet Pusavale) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तसंच आता सुमित पुसावळेनं मोनिका महाजनसोबत बुधवारी (14 डिसेंबर) लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
सुमित आणि मोनिका या दोघांचा सांगोला येथे विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला. या लग्नाला त्याच्या सहकलाकारांनी, मित्र मंडळींनी तसंच नातेवाईकांनी हजेरी लावली होती. सुमितच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसंच सुमितनं यावेळी भरमंडपात बायकोसाठी भन्नाट उखाणा घेतला आहे.
“गल्लीमध्ये खेळत होतो क्रिकेट तिकडून आली मोनिका आणि पडली माझी विकेट”, असा उखाणा सुमितनं घेतला आहे. सुमितनं हा उखाणा घेताच मोनिका लाजल्याचंही दिसत आहे. तसंच सुमितनं उखाणा घेतलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.