ताज्या बातम्यादेश - विदेश

केंद्र सरकारकडून तरूणांना दिवाळी गिफ्ट, केली ‘ही’ मोठी घोषणा!

नवी दिल्ली | Central Government Jobs – केंद्र सरकारकडून तरूणाईला मोठं दिवाळी गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकारकडून धनत्रयोदशीच्या दिवशी 75 हजार जणांना सरकारी नोकरीचं नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 22 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आहे. यामध्ये 10 लाख जणांना रोजगार देण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या पहिल्या टप्प्यात 75 हजार लोकांची भरती केली जाणार आहे. तसंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते या ऑनलाईन मेळाव्याचा शुभारंभ होणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्रालये आणि विभागांमध्ये असलेल्या मंजुरीप्राप्त रिक्त जागा भरण्याचं काम मिशन मोडवर सुरू झालं आहे. देशभरातून निवडले गेलेल नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या 38 मंत्रालये आणि विविध विभागांमध्ये कामावर रूजु होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसंच ब श्रेणी (अ-राजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरती योग्य पदांमध्ये, केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे. मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आली आहे.

पुढील दीड वर्षात केंद्र सरकार आपल्या विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये 10 लाख लोकांची भरती करणार आहे. स्वतः सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला, असल्याचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  14 जून 2022 रोजी केलं होतं. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये