अर्थपिंपरी चिंचवड

मालमत्ता करात सवलत मिळवण्याची संधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत विविध मालमत्तांना वेगवेगळ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. कोणत्याही सवलतीचा लाभ हवा असेल, तर ३० जूनपूर्वी संपूर्ण मालमत्ता कराचा भरणा करून नागरिकांनी सवलतींचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालमत्ता कर विभागामार्फत विविध मालमत्तांना वेगवेगळ्या सवलती जाहrर करण्यात आलेल्या आहेत. यापैकी कुठल्याही सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, तर ३० जूनपूर्वी आपल्या संपूर्ण मालमत्ता कराचा भरणा करून नागरिकांनी सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन मालमत्ता कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.

महापालिकेच्या वतीने महिलांना सामान्य करामध्ये ५० टक्के सवलत, दिव्यांगांना सामान्य करामध्ये ५० टक्के सूट, माजी सैनिकांना मालमत्ता करात संपूर्ण सवलत, तसेच ऑनलाइन पेमेंट केल्यास ५ टक्के सवलत देण्यात येते. ३० जूनपूर्वी आगाऊ भरणा करणार्‍या नागरिकांना सामान्य करात १० टक्के सूट देण्यात येते. तसेच, पर्यावरणपूरक इमारतींना व निवासी मालमत्तांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्यास त्यांना सूट मिळते. यामध्ये पर्यावरणपूरक मालमत्तांना १० टक्के, आगाऊ भरणासाठी १० टक्के, तसेच ऑनलाइन भरणासाठी ५ टक्के अशी एकूण २५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. सवलत घेण्याची शेवटची तारीख ३० जून २०२२ असून, सर्व नागरिकांनी मालमत्ता कर सवलतीचा लाभ घेणे आवश्यक आहे.

अनेक लोकांनी मनपाकडे भरणा केलेला आहे, मात्र ज्या लोकांनी अद्यापपर्यंत भरणा केलेला नाही अशा नागरिकांना नियम १३८ अन्वये नोटीस पाठविलेली आहे. म्हणजे ज्यामध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होतो. ज्यांचे उत्तर मिळालेले नाही, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यानंतर गेल्यावर्षी ज्या मालमत्तांना जप्तीपूर्व नोटिसा दिलेल्या होत्या, त्यामधील ज्या लोकांनी अद्यापपर्यंत कराचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्तांची १ जुलै २०२२ पासून जप्तीची कार्यवाही सुरू करणार असून, त्यामध्ये जप्ती कार्यवाही कामी महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स व क्षेत्रीय कार्यालयाकडील संपूर्ण टीम अशाप्रकारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

अशी अप्रिय कार्यवाही टाळण्यासाठी नागरिकांनी कराचा भरणा करणे आवश्यक आहे. याचबरोबर अशा स्वरूपाची कार्यवाही करीत असताना काही दंडनिहाय कार्यवाही असल्यास त्याचाही विचार मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने जे नागरिक प्रामाणिकपणे मालमत्ता कर भरणा करीत आहेत, त्यांना सवलत योजना व जे नागरिक कराचा भरणा करीत नाहीत, त्यांच्यासाठी जप्तीची कार्यवाही, अशी दुहेरी कार्यवाही करण्यात येत आहे.

मालमत्ता कराचे ऑफलाइन पेमेंट पीएमसीच्या कोणत्याही वॉर्ड कार्यालयात करता येते. रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट हे पेमेंट पर्याय आहेत जे ऑफलाइन पेमेंटसाठी उपलब्ध आहेत.

पिंपरी-चिंचवड मालमत्ता कर हा मालमत्तेच्या वास्तविक मूल्याची टक्केवारी म्हणून मोजला जातो जो रेडिरेकनर विश्लेषण किंवा महसूल विभागाद्वारे मुद्रांक निश्चित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या परिपत्रक दरावर आधारित असतो. तथापि, पिंपरी-चिंचवडच्या अधिकृत साइटवर कॅलक्युलेटर उपलब्ध आहे आणि त्या विशिष्ट क्षेत्रासाठी मालमत्ता कर मूल्याचे स्व-मूल्यांकन करण्यास अनुमती देते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये