ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईला 14 जुलैपर्यंत ऑरेंज अर्लट; ‘या’ जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई | Orange Alert For Mumbai – सध्या राज्यात पावसानं चांगलंच थैमान घातलं आहे. राज्यातील सर्वच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.  दरम्यान, मुंबईत येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर 14 जुलैपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे.

मुंबईत थोड्याशा पावसानंही अनेक ठिकाणी पाणी साचतं. यापार्श्वभूमीवर पुढील चोवीस तास मुंबईसाठी महत्वाचे असणार आहेत. कारण या काळात मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सर्वसाधारण ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तसंच मुंबईत मुसळधार पावसासोबतच सध्या ४० ते ५० किमी प्रतितास वेगानं वारे वाहत आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, येत्या तीन-चार तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथे, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या दहा जिल्ह्यांमध्ये साधारण ते मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये