अमृत महोत्सव निमित्त निगडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
![अमृत महोत्सव निमित्त निगडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन blood donation saves the lives of others 1480269857](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/blood-donation-saves-the-lives-of-others_1480269857-780x470.webp)
पुणे : आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कधी काय होईल याची शास्वती देता येत नाही. सलग दोन देशात नव्हे तर जग भरात कोरोनाने थैमान घातले होते. यामध्ये कोरोना बाधित रुग्णांना मोठ्या रक्ताची (प्लाझ्मा)ची मोठी गरज भासत होती. यासह दररोज आपण वर्तमानपत्रात अपघाताच्या बातम्या वाचतो. कारण अपघात काही सांगून येत नाही, वेळ कधी कुणाचा घात करेल माहीत नाही. विविध केसेसमध्ये त्या रुग्णांना रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासते.
काही रुग्णांचा वेळीच रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूही होतो. त्यामुळे अडचणी वेळेस रक्तदानाची गरज भासते याची गरज ओळखून स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, स्वदेशी जागरण मंडळ तसेच महिला समन्वय समिती तर्फे महिलांचे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबीर स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी येथे शनिवारी ११ जून रोजी सकाळी १० ते २ यावेळे होणार आहे.
तरी या रक्तदान शिबीरात महिलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन उत्कर्षा कुलकर्णी यांनी केले आहे. आज काल रक्तदान विषयी काही लोकांमध्ये गैरसमज असल्याचे आढळून येतात जसे की, रक्तदान केल्याने कमजोरी येते. चक्कर येते. मळमळ होते. काम करता येत नाही हे आणि असे बरेच समज आणि गैरसमज लोकांमध्ये आहेत. खरंतर यापैकी एकही लक्षण रक्तदान केल्यानंतर आढळत नाही आणि हे केवळ निव्वळ गैरसमज आहेत.
रक्तदान करण्यासाठी पण काही निकष आहेत. रक्तदान करताना दाता हा वय वर्ष १८ ते ६५ वयातील असला पाहिजे. त्याचे वजन साधारणत: ४८ किलो भरले पाहिजे. रक्तदान करणा-या व्यक्तीला कोणताही संसर्गजन्य आजार नसला पाहिजे. रक्तदान करताना शरीरास कोणतीही इजा होत नाही किंवा त्याचे काही दुष्परिणामही नाहीत. साधारणत: प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात ५ लिटर रक्त असते आणि रक्तदानात केवळ ३५० मिली एवढेच रक्त घेतले जाते. त्यामुळे कोणतेही गैरसमज न करता शिबीरात उत्स्फुर्त पणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.