
शुद्ध पाणी ही काळाची गरज : खा. सुप्रिया सुळे
पुणे ः कोरोनाकाळापासून नागरिक आरोग्याला खूप जपत आहेत. रोजच्या वापरात पिण्याचे शुद्ध पाणी ही आता काळाची गरज ओळखून पिण्याच्या पाण्याबाबत दक्ष राहून शुद्ध पाण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत खा. सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
माणिकचंद ऑक्सिरीच या नामांकित पाण्याच्या कंपनीच्या अधिकृत उत्पादन करण्याचे हक्क मिळविलेल्या सुमंगलम् फूड्स अँड बेव्हरेजेस या नव्याने उभारलेल्या कंपनीचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे व मा. शोभाताई रसिकशेठ धारिवाल (चेअरमन आर. एम. धारिवाल फाउंडेशन) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मा. जान्हवी धारिवाल बालन व मा. पुनीतदादा बालन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.
आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू नागरिकांना देणगी, विद्यार्थ्यांना फीसाठी मदत, शैक्षणिक संस्था संघटनांना मदत, पर्यावरण संवर्धनासाठी उपक्रम असे अनेक उपक्रम माणिकचंद ग्रुप करत असल्याचे फाउंडेशनच्या अध्यक्षा मा. शोभाताई धारिवाल यांनी सांगितले. यावेळी सुमंगलम् फूड्सचे संचालक नानासाहेब जगताप, पवन निवंगुणे, विश्वजित शिळीमकर, पवन जांभळे, चंद्रकांत सवार, दत्तात्रय जाधव व विराज रुपनवर यांनी उपस्थितांचे सत्कार केले.