देश - विदेशमनोरंजनमहाराष्ट्र

सलमान – शाहरुख येणार एकत्र, तब्बल 27 वर्षांनंतर करणार एकत्र काम

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरूख खान हे दोघे लवकरच एकत्र येणार आहेत. सलमान आणि शाहरूख दोन्ही बॉलीवुडमधली दमदार नावं. यांचा चित्रपट रिलीज होणार म्हटलं की प्रेक्षकांना भारी उत्सुकता लागलेली असते. मात्र तब्बल 27 वर्षांनंतर पठाण आणि टायगर एकत्र एका चित्रपटात काम करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

करण अर्जून या चित्रपटानंतर थेट २०२२ मध्ये सलमान आणि शाहरूख एकत्र काम करणार असल्यातची बातमी मिळतेय. त्यामुळे दोन दमदार कलाकारांच्या एन्ट्रीसह हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार आहे. २०२३-२४ मध्ये आदित्य चोप्राचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून अद्याप या चित्रपटाचं नाव जाहीर झालेलं नाही

शाहरूख आणि सलमान या दोन दिग्गज कलाकारांना एकत्र आणून अनोखा चित्रपट निर्माण करण्याची आदित्यची भूमिका आहे. या चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि डायलॉगवर काम सुरू आहे. तसंच सलमान आणि शाहरूख तब्बल २७ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. विशेष म्हणजे या दोघांमधले मतभेद जगापासून लपलेले नाहीत. बऱ्याच काळानंतर हे दोघे एकत्र येणार म्हणून चाहते त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये