पंढरपूरची ‘बुलेटवारी’

काही वर्षातच पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन वारकऱ्यांना बुलेट ट्रेनमधून कमीत कमी वेळात प्रवास पूर्ण करत घेता येणार आहे. या संदर्भातली हवाई पाहणी पूर्ण झाली आहे.
पंढरपूर : मुंबई, ठाणे, पुणे येथील वारकऱ्यांना, प्रवाशांना आता काही वर्षातच बुलेट ट्रेनमधून पंढरपूर पर्यंतचा प्रवास करता येईल. मुंबई,पंढरपूर गुलबर्गा मार्गे हैदराबाद या मार्गावर बुलेट ट्रेन धावणार असून, ७११ किलोमीटरचा प्रवास ही ट्रेन करणार आहे. या मार्गाचे हवाई सर्वेक्षण इमेजनरी सेन्सर आणि एरियल रडाराने केले आहे.
नॅशन हाय स्पीड रेल्वे ॲथॉरिटीकडे या संदर्भातील सर्वेक्षण अहवाल सादर केला असून, तो मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे देण्यात आला आहे. या मार्गावर एकूण ११ स्टेशन्स केली जाणार आहेत.
एनएचआरसीएलला अर्थात नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला प्रथम या संदर्भात अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या बुलेट ट्रेनच्या कामास रेल्वे मंत्रालयाच्या सूचनेनुसार सुरुवात करण्यात येणार असल्याचे समजते.महाराष्ट्र आंध्र, कर्नाटक येथील वारकरी आणि पर्यटनप्रेमींना हा प्रवास नक्कीच आकर्षित करणारा आहे. वारकरी मंडळींना बुलेट ट्रेनचा प्रवास आणि वेळेत बचत असा दुहेरी आनंद यामुळे मिळेल.