Top 5क्राईमताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रमुंबईविश्लेषण

पोलिसांच्या व्यथा जाणणार का ?

राष्ट्रसंचार न्यूज नेटवर्क
शिक्रापूर : नागरिकांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात तसेच कोणतीही घटना घडल्यास लोकांना आठवण येते तो विभाग म्हणजे पोलीस. मात्र बारा महिने, चोवीस तास काम करुन देखील पोलिसांकडेच शासनाचे दुर्लक्ष असल्याची बाब खेदजनक असल्याचे
दिसून येत आहे.

बोनसपासून पोलीस लांब :
ही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासनाकडून एका महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येतो. तसेच जुनी पेंशन योजना नाही, अशी स्थिती असताना सुद्धा त्याबाबत आवाज उठवण्यास कोणीही पुढे येत नाही.

समाजामध्ये अनेक शासकीय विभाग असून, त्यामध्ये प्रत्येक घटकातून शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांसह आदी घटकांना आठवड्यात दोन दिवस सुट्टी असते इतकेच नव्हे तर त्यांचे कार्यालय सुद्धा आठवड्यात दोन दिवस बंद असते. शिवाय प्रत्येक शासकीय सुट्टीचा उपभोग या विभागांना घेता येत असतो. तर कोठेही काही घटना घडल्यास नागरिकांना प्रथम आठवण होते ती पोलिसांची. प्रत्येक घटनेला पोलीस तातडीने हजर देखील झालेले असतात. इतकेच नव्हे तर इतर शासकीय विभागांना आठ तास ड्युटी असते. मात्र, पोलिसांना चोवीस तास ड्युटी असते. अत्यंत प्रतिकुल परििस्थतीत काम करुन देखील पोलीस बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही, ही शोकांतिका आहे. कोणत्याही शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी अनेकदा संप तसेच आंदोलन करतात. शासनाकडून त्यांच्या मागण्या पूर्ण करुन घेत असतात. अशा संप काळामध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तर पोलिसांचे कधीही कोठे आंदोलन झाल्याचे कोणीही पाहिले नाही. कारण पोलिसांना संघटना नाही. जीवनात त्‍यांना कोणतीही हौस करता येत नाही. त्‍यांना नियमांचे पालन करावेच लागते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये