खरंच की! परिणीती चोप्रा आणि आपच्या खासदाराच्या प्रेम प्रकरणावर शिक्कामोर्तब, दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव
![खरंच की! परिणीती चोप्रा आणि आपच्या खासदाराच्या प्रेम प्रकरणावर शिक्कामोर्तब, दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव parineeti chopra raghav chadda](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/parineeti-chopra-raghav-chadda-780x470.jpg)
मुंबई | Parineeti Chopra And Raghav Chadha – बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. हे दोघं मुंबईत दोन दिवस एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांच्या डेटींगच्या चर्चा सुरू झाल्या. तसंच आता या दोघांच्या नात्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनी बोलणी सुरू केली असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता या दोघांच्या नात्यावर आपचे खासदार संजीव अरोरा (Sanjeev Arora) यांनी ट्विट करत शिक्कामोर्तब केलं आहे.
खासदार संजीव अरोरा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुमच्या दोघांचं नातं प्रेम, आनंद व सहवासानं भरलेलं असावं. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा”, असं ट्विट करत संजीव अरोरा यांनी परिणीती आणि राघव यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
दरम्यान, परिणीतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये परिणीती बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी जाताना दिसली. त्यामुळे आता तिच्या लग्नाची तयारी सुरु झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.
रविवारी (26 मार्च) परिणीती मनीष मल्होत्राच्या घरी पोहोचली होती. त्यामुळे परिणीतीच्या लग्नाच्या कपड्यांची जबाबदारी मनीषवर असल्याची शक्यता चाहते व्यक्त करत आहेत. तसंच परिणीतीच्या या व्हिडीओवर चाहते कमेंट्सही करत आहेत.