IPL 2023 | स्टेडियममध्ये एकाच नाद…’परिणीती भाभी जिंदाबाद’….

मुंबई | अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) व आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) या दोघांच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा सुरू आहेत. महिनाभरापूर्वी ते मुंबईत एकत्र दिसले होते, तेव्हापासून त्यांच्या अफेअर व लग्नाच्या चर्चा सातत्याने सुरू आहे. अशातच हे दोघे आयपीएलचा सामना पाहायला स्टेडियममध्ये गेल्याचं पाहायला मिळालं. राघव व परिणीतीला एकत्र पाहून क्रिकेट चाहत्यांनी स्टेडियम दणाणून सोडलं होतं. हे पाहून परिणीती आणि राघव यांनाही हसू अनावर झालं.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांचा सामना पाहण्यासाठी राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे पंजाब क्रिकेट असोसिएशन मोहाली पोहोचले होते. या दोघांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्टेडियमच्या एका स्टँडवर उभे असलेले परिणीती आणि राघव आणि दुसऱ्या स्टँडवरील प्रेक्षक ‘परिणीती भाभी जिंदाबाद’च्या घोषणा देतानाचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या घोषणा ऐकून दोघांनाही हसू अनावर झालं. परिणीतीने तर या घोषणा ऐकून डोक्यालाच हात लावला.