ठरलं! ‘या’ दिवशी होणार परिणीती-राघव यांचं ग्रँड रिसेप्शन

Parineeti-Raghav Reception | बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि ‘आप’चे नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) हे दोघं 24 सप्टेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. उदयपूरमधील ‘द लीला पॅलेस’मध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. तर सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही खास फोटो व्हायरल होत आहेत. अशातच आता परिणीत आणि राघव यांच्या रिसेप्शनची तारीख आणि ठिकाण समोर आलं आहे.
परिणीती आणि राघव हे तीन ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याचं म्हटलं जात होतं. नातेवाईकांसाठी चंडीगढमध्ये, दिल्लीत राजकीय नेत्यांसाठी आणि मुंबईत बॉलिवूड कलाकारांसाठी अशा या तीन ठिकाणी ते रिसेप्शन देणार असल्याची माहिती समोर आली होती.
तर आता परिणीती आणि राघव यांनी दिल्ली, चंडीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द केला आहे. आता त्यांच्या रिसेप्शनचं आयोजन फक्त मुंबईतच करण्यात आलं आहे. 4 ऑक्टोबरला त्या दोघांच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात येणार आहे.