परिणीती-राघव दिसले पुन्हा एकत्र; मात्र बोटातील अंगठीने वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई | अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti chopra) आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) यांच्या लव्ह लाईफच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. ते दोघे खूप लवकर लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते अनेक वेळा एकत्र दिसतात. काही दिवसांपूर्वीच ते दोघेही आयपीएल मॅच पाहण्यासाठी एकत्र आले होते. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता रविवारीसुद्धा परिणीती आणि राघव मुंबईतील वांद्रे येथे एका रेस्टॉरंट बाहेर दिसले होते. रंजक गोष्ट अशी आहे की यादवेळी परिणीतीच्या अनामिकेमध्ये हिऱ्याची अंगठीही दिसली. त्यामुळे त्यांनी साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
सर्वांचे लक्ष परिणीती बोटातील अंगठीवर…
विशेष म्हणजे राघवसोबत डेट नाईट एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलेल्या अभिनेत्री परिणीती चोप्राच्या अनामिकेतील मोठ्या हिऱ्याच्या अंगठीने सर्वांचेच लक्ष वेधले. परिणीती आणि राघवची एंगेजमेंट झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.