ताज्या बातम्यामनोरंजन

“फुलावर फिरत असतो…”; पाठकबाईंनी घेतला राणादासाठी खास उखाणा

मुंबई | Pathakbai Took A Special Ukhana For Ranada – ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली होती. या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई म्हणजेच आभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच लवकरच ही प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. अक्षया आणि हार्दिकने अक्षय्य तृतीया दिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचबरोबर सध्या अक्षया आणि हार्दिक हे एकमेकांना वेळ देताना दिसत आहे. तर नुकतंच अक्षयाने हार्दिकसाठी खास उखाणा घेतला आहे.

नुकतंच अक्षयाने एका कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या कुटुंबातील काही सदस्यांनी अक्षयाला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला. तिनेही त्यांच्या आग्रहाचा मान ठेवत लाजत मुरडत खास उखाणा घेतला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये उखाणा घेत अक्षया म्हणते, ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, ‘फुलावर फिरत असतो भुंगा त्याला हिंदीत म्हणतात भवरा, हार्दिक रावांच नाव घेते कारण तो आहे माझा होणारा नवरा’. अक्षयाच्या या भन्नाट उखाण्यानंतर तिच्या सगळ्या पाहुण्यांनी तिचे कौतुक केलं आहे. तसंच अक्षयाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताच यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच हार्दिक जोशीनेही त्यावर कमेंट केली आहे. त्यावर त्याने हात जोडतानाचा आणि हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये