सर्व सुविधा देणारे ‘पवार इलेक्ट्रिकल्स’ होतेय लोकप्रिय
![सर्व सुविधा देणारे ‘पवार इलेक्ट्रिकल्स’ होतेय लोकप्रिय thackery 17](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/thackery-17-780x470.jpg)
काही लोक मल्टिपर्सनॅलिटी म्हणतात तसं खूप काही एकाच वेळी हॅन्डल करतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला काही वेळा विश्वासच बसत नाही की, खूप सार्या गोष्टी ही एकटी व्यक्ती मॅनेज करीत असेल, असंच काहीतरी अजित शामराव पवार यांच्याबद्दल सांगता येईल. अजित यांचा ‘पवार इलेक्ट्रिकल्स’ नावाचा इलेक्ट्रिकल्सचा व्यवसाय आहे. त्यांच्या इलेक्ट्रिकल्समध्ये घरातील सर्व इलेक्ट्रिकल्सच्या वस्तू जसे, पंखा, लाईट फिटिंगसाठीच्या सर्व वस्तू आणि घरातल्या सर्व इलेक्ट्रिक आणि होम अॅप्लायन्सेसच्या वस्तू मिळतात. तेही कमी दरात आणि वॉरंटीसह.
ग्राहकांना त्यांच्या घरी जाऊन लाईट फिटिंग आणि इतर जे ग्राहकांना इलेक्ट्रिकल्सच्याबाबतीत कमी माहिती असते, असं सगळं फिटिंग करण्यासाठी पवार इलेक्ट्रिकल्सचे कामगार घरी येतात. अजित यांनी ‘पवार इलेक्ट्रिकल्स’चा व्यवसाय २०१६ मध्ये सुरू केला. तेव्हापासून अगदी यशस्वीरीत्या ते ग्राहकांना सेवा पुरवत आहेत. त्याआधी बीकॉम झाल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे फायनान्समध्ये नोकरीही केली आहे. मुंबईमध्ये असताना अनेक गोष्टीींची त्यांना माहिती मिळाली. इलेक्ट्रिकल्सच्या व्यवसायाबाबतही त्यांना मुंबईत असतानाच कल्पना सुचली. इलेक्ट्रिकल्सच्या व्यवसायाबरोबरच त्यांची स्वतःची जिमदेखील आहे.सकाळी जिमचं सगळं ते बघतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल्सच्या शॉपवर हजर असतात. जिम आणि इलेक्ट्रिकल्सच्या व्यवसायाबरोबरच अजित यांनी आपले छंदही जोपासले आहेत.
त्यांना अॅक्टिंगची आवड आहे. बर्याच वेळा वेळ मिळेल तेव्हा ते अॅक्टिंग करतात आणि सोशल मीडियावर टाकत असतात. अनेक गोष्टी करीत असताना ते कधीही थकलेले दिसत नाहीत. आपल्या कामावर आपलं प्रेम असायला पाहिजे. काही वेळा कामामुळे आपले छंद जोपासता येत नाहीत, पण आपण त्यासाठी प्रयत्न करीत राहायला पाहिजे, असं ते म्हणतात.
अजित पवार