“आम्ही गद्दार नाहीच” पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर; एकनाथ शिंदेंच नवं ट्वीट
!["आम्ही गद्दार नाहीच" पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर; एकनाथ शिंदेंच नवं ट्वीट Eknath Shinde and sharad pawar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/Eknath-Shinde-and-sharad-pawar-.jpg)
मुंबई : शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी ते म्हणाले, बंडखोरांना इथं यावचं लागेल आणि तेव्हा आसामचे भाजप नेते मार्गदर्शन करायला इथे येतील असं वाटत नाही असे सांगितलं. पुढे एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचे सांगताना एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर बोलताना शरद पवारांनी सर्व राष्ट्रीय पक्षाची नावे घेत यापैकी कुठला पक्ष बंडखोरांना मदत करतोय. हे सांगण्यासाठी कुठल्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही असे म्हटलं आहे.
सत्तेचा सस्पेन्स वाढत असून एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला चॅलेंज केलं आहे. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते उद्या आमदारांच्या सह्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. आपण भाजपसोबत जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून याचा व्हिडिओ समोर आला आहे.