ताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

देशाचे पंतप्रधान देहू नगरीत; अभंगातील ओळी म्हणून वारकऱ्यांना केलं संबोधित

पुणे – PM NARENDRA MODI VISITS PUNE | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू नगरीतील शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी वारकऱ्यांना संबोधित केलं. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी मराठीत ‘श्री नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा…’ अभंगानं केली. त्यामुळं सर्व वारकऱ्यांत आनंदाचं वातावरण दिसलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे :
1) संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच काम तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे.
2) भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन आणि जिवंत संस्कृती आहे आणि ती असण्यामागचं सगळं श्रेय देशाच्या संत परंपरेला जाते.
3) संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतून आम्हाला प्रेरणा मिळते.
४ ) ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’ सर्वांनी एकमेकांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे.
५ ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात संत तुकाराम महाराजांसारख्या संतानी खूप महत्वाची भूमिका बजावली.
६) वीर सावरकर तुरुंगात असताना हातकडीला चिपळ्यासारखं वाजवून संत तुकारामांचे अभंग म्हणत.
7) महाराष्ट्रातील पंढरपूर वारी आणि काशी, रामेश्वर, तसंच जगन्नाथ यात्रा यांसारख्या वाऱ्या आपल्या सामाजिक आणि अध्यात्मिक प्रगतीसाठी उर्जास्रोत आहेत.
८) देशाचा विकास आणि विरासत दोन्ही एकसोबत पुढे घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
९) पंढरपूर पालखी मार्गाचं आधुनिकीकरण, चार धाम यात्रेसाठी हायवे. अयोध्येतील भव्य राम मंदिर. काशी विश्वनाथ आणि सोमनाथ परीसाराचा विकास. अशा देशभरातील संपूर्ण धार्मिक स्थळांचा विकास केला जात आहे.
10 ) गेल्या आठ वर्षांत बाबासाहेब आंबेडकरांच्या पंचातीर्थांचा देखील विकास केला जात आहे.
११) ‘असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे’ संत तुकाराम महाराज म्हणतात, एका दिशेने सर्वांनी योग्य प्रयत्न केले तर अश्यक्य देखील शक्य होऊ शकते. आपणही देशाच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत आहोत.

१२ ) आपल्याला पर्यावरणाकडे लक्ष दिले पाहिजे. प्लास्टिक विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. शेतीसाठी नैसर्गिक खातानाचा वापर करायला हवा.
अशा पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी अभंगातील ओळींचा समावेश करत हजारो वारकऱ्यांना संबोधित केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये