अर्थदेश - विदेशपुणेशिक्षण

अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई

पुणे : उद्यापासून बहुसंख्य शाळा सुरू होत असताना, पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व पालकांना बेकायदेशीर शाळांमध्ये प्रवेश न घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. पीएमसीच्या शिक्षण विभागाने पालिकेच्या हद्दीतील १६ शाळांना बेकायदेशीर म्हणून सूचिबद्ध करणारे पत्र, पुणे शिक्षण उपसंचालकांना पाठवले आहे.

या शाळांना रीतसर परवानग्या नसल्याने शिक्षण विभागाने त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातील २७ बेकायदा शाळांची अशीच यादी शिक्षण विभागाने प्रसिद्ध केली असून, त्यांना या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश न घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. या शाळांना परवानगी नाही आणि तेथे कोणीही प्रवेश घेऊ नये, असे सांगत शिक्षण विभागाने या शाळांना बाहेर फलक लावण्याच्या कठोर सूचना केल्या होत्या.

शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिर्डे म्हणाले, ही एक गंभीर समस्या असून, बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आमचे सर्व पालकांना आवाहन आहे. आतापर्यंत, आम्हाला पुणे जिल्ह्यातील २७ बेकायदेशीर शाळांची यादी मिळाली होती. त्यात पालिका हद्दीमध्ये १६ बेकायदेशीर शाळा सापडल्या. बेकायदेशीर शाळांना मुलांचे प्रवेश घेऊ नयेत, वर्गही सुरू करू नयेत, अशा सूचना दिल्या आल्या आहेत.

पुणे महापालिका कार्यक्षेत्रात आढळलेल्या बेकायदेशीर शाळा

१. ज्ञानप्रबोधिनी प्राथमिक विद्यामंदिर, शाखा क्र.३ काळेपडळ
२. महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, संजय पार्क
३. आशा इंग्लिश मीडियम स्कूल, खोसे पार्क, लोहगाव
४. कॅनरी इंटरनॅशनल स्कूल, येरवडा
५. लिटल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, कलवड वस्ती
६. ज्ञानसंस्कार प्राथमिक इंग्रजी माध्यम शाळा, धनकवडी
७. ट्विन्स लँड स्कूल, कोंढवा
८. इक्रा इस्लामिक स्कूल, वानवडी
९. नोबल इंग्लिश स्कूल, गुरुवार पेठ
१०. सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल, कोंढवा बुद्रुक
११. अंकुर इंग्लिश मीडियम स्कूल, बालाजीनगर
१२. इंग्रजी माध्यम लाटवन शाळा,धनकवडी
१३. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल, बिबवेवाडी
१४. शांतीनिकेतन शाळा, येरवडा
१५. आयडियल पब्लिक स्कूल, डीएसके रोड, विठ्ठलनगर

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये