देश - विदेशरणधुमाळी

देशाला ‘नवा विचार’ देणारा राजकीय महाकुंभ; एमआयटीच्या वतीने देशभरातील आमदारांचे मुंबईत अधिवेशन

पुणे : संपूर्ण भारतभरातील विधानसभा सदस्यांचे राष्ट्रीय अधिवेशन मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी सुमारे साडेचार हजार लोक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. पक्षीय मतभेद विसरून विकासाचा एक नवा जागर या निमित्ताने सुरू होईल, असा आशावाद व्यक्त होत आहे. एमआयटीचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड यांच्या संकल्पनेतून ही परिषद साकारत आहे.

संविधान समजून घेऊन राज्य आणि देशाच्या विकासाची कामे करणे, नवीन आमदारांना विकास कल्पना प्रणालीच्या विभागाविषयी संवेदनशील करणे, तसेच समस्या लक्षात घेऊन वेळेनुसार कार्यक्रमात बदल करणे, देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करून, राष्ट्रीय विधिमंडळ परिषदेच्या माध्यमातून देशात समाज विकासाची नवी लाट सुरू होणार आहे. राष्ट्रीय विधायक परिषदेच्या परिसंवादात ही कल्पना मांडण्यात आली.

कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ नवी दिल्ली येथे आयोजित चर्चासत्रात लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील, सुमित्रा महाजन आणि मीरा कुमार यांनी देशाची संविधानिक मूल्य, घटना, समाजाचा विकास, निवडणुका, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आपण कसे उन्नत करू शकतो, या विषयी चर्चा करून आपले विचार मांडले. त्याच वेळी त्यांनी १६ ते १८ जून २०२३ दरम्यान मुंबईत राष्ट्रीय आमदारांची परिषद होणार आहे, असे जाहीर केले. या चर्चासत्रात पाहुण्यांच्या हस्ते नॅशनल लेजिस्लेटर कॉन्फरन्स २०२३ च्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबईत होणाऱ्या परिषदेत सुमारे ४५०० प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असून, ते आपल्या विचारसरणीला विसरून चांगले वातावरण निर्माण करण्याचे काम करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये