बाॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं गायलं मराठी भक्तीगीत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का
![बाॅलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं गायलं मराठी भक्तीगीत, व्हिडीओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का pooja hegde](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/12/pooja-hegde-780x470.jpg)
मुंबई | Pooja Hegde – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिचा ‘सर्कस’ (Circus) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अत्यंत तडगी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पूजा, अभिनेता रणवीर सिंग आणि संपूर्ण टीम सर्वत्र भेट आहेत. यानिमित्तानं ते ‘झी मराठी’वरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात आले होते. यावेळी पूजानं मराठी भक्तीगीत गाऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात फक्त मराठीच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. यावेळी या कार्यक्रमात ‘सर्कस’ चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), रणवीर सिंग (Ranveer Singh), जाॅनी लिव्हर (Johnny Liver), दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty), अभिनेत्री पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस (Jackline Fernandis) आणि अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी पूजा हेगडेनं चक्क मराठी भक्तीगीत गायलं आहे.
यावेळी पूजानं ‘देहाची तिजोरी.. भक्तीचाच ठेवा.. उघड दार देवा आता.. उघड दार देवा’ हे मराठी भक्तीगीत गायलं आहे. तिनं हे भक्तीगीत गायल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर निलेश साबळेसह (Nilesh Sabale) सर्वांनीच तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. तसंच तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
.